टॉप लेस सीन देण्यास सनी लियॉनचा नकार

पॉर्न जगतात धुमाकूळ माजविल्यानंतर हॉलिवुडमध्ये नाव करणाऱ्या सनी लियॉनने एका चित्रपटात टॉपलेस सीन देण्यास नकार दिला आहे. ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 23, 2013, 06:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पॉर्न जगतात धुमाकूळ माजविल्यानंतर हॉलिवुडमध्ये नाव करणाऱ्या सनी लियॉनने एका चित्रपटात टॉपलेस सीन देण्यास नकार दिला आहे. ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सनी लियॉनने ठामपणे नकार दिल्यावर अखेर दिग्दर्शकाने तंत्रज्ञानाचा वापर करत या सीनचे शुटींग उरकले आहे.
पॉर्नस्टार म्हणून प्रसिध्द असलेल्या सनी लियॉनने बिग बॉस या शोच्या माध्यमातून भारतात प्रवेश केल्यानंतर तिने बॉलिवुडमध्ये जिस्म २ मधून एन्ट्री केली. तिच्या पॉर्नस्टार इमेजमुळे तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली.
‘शूट आऊट अॅिट वडाला’ या चित्रपटातून तिने एक आयटम साँग करुन तिच्या दिलखेचक नृत्याची झलकही दाखवली. आता सनी लियॉन एका हॉरर चित्रपटात प्रमूख भूमिकेत आहे.
सनीच्या बोल्ड अंदाजामुळे दिग्दर्शकाने चित्रपटात एक टॉपलेस सीन ठेवला होता. मात्र सनी लियॉनने दिग्दर्शकाला हा सीन करण्यास नकार दिला. दिग्दर्शकाने तिची मनधरणी केल्याचा प्रयत्नही केला मात्र सनी तिच्या निर्णयावर ठाम होती.
अखेरीस दिग्दर्शकाने सनी लियॉनला बिकनी देऊन सीनचे शूट उरकले. यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तिला टॉपलेस दाखवण्याची खेळी दिग्दर्शकाने खेळली. सनी लियॉनने बॉल्ड सीन देण्यास नकार दिल्याने आता बॉलिवडूच्या दिग्दर्शकांची चांगलीच गोची होण्याची चिन्हे आहेत

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.