व्हायचं असेल रोड, तर खा बदाम किंवा अक्रोड

जाडेपणा नको असेल तर रोज थोड्या प्रमाणात सुका मेवा खा. स्पेनमधील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की रोज २८ ग्रॅम कच्चे, साल न काढलेले बदाम किंवा अक्रोड खाल्ल्यास चरबी वाढत नाही.

Updated: Nov 7, 2011, 11:08 AM IST

लंडन- जाडेपणा नको असेल तर रोज थोड्या प्रमाणात सुका मेवा खा. स्पेनमधील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की रोज २८ ग्रॅम कच्चे, साल न काढलेले बदाम किंवा अक्रोड खाल्ल्यास चरबी वाढत नाही. शास्त्रज्ञांच्या मते बदामांमुळे मेंदूमधील सेरोटेनिन नामक रसायनाची पातळी वाढते. हे रसायन भूकेची जाणीव कमी करते आणि आनंदी ठेवते. हे रसायन हृदयालाही निरोगी राखतं. शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढण्यापूर्वी अर्धांगवायू, हृदयविकार, मधूमेह तसंच पचनाचे विकार असणाऱ्या रुग्णांचा अभ्यास केला होता. त्यातूनच हे अत्यंत प्रभावी संशोधन घडलं.

 

रुग्णांचे वजन कमी होण्यासाठी आणि तब्येत लवकर सुधारण्यासाठी यूनिव्हर्सिटी ऑफ बार्सिलोनाच्या शास्त्रज्ञांनी रुग्णांच्या खाण्या-पिण्यात बदल करून त्यांचा अभ्यास केला.