श्रीलंकेसमोर २३२ रन्सचे माफक आव्हान

तिरंगी मालिकेतील तिसऱ्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर केवळ २३२ रन्सचे माफक आव्हान ठेवले आहे.

Updated: Mar 8, 2012, 03:30 PM IST

www.24taas.com,अॅडलेड 

 

तिरंगी मालिकेतील तिसऱ्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने  श्रीलंकेसमोर केवळ २३२ रन्सचे माफक आव्हान ठेवले आहे.

 

 

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाचा चांगली सुरवात करून दिली. त्यांनी प्रत्येकी ४९ आणि ४८  रन्स  केल्या. मात्र दोघे बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सगळा संघ केवळ ४९.३ षटकात २३१ रन्सवर  गुंडाळला गेला.

 

 

श्रीलंकेकडून हेरथ, कुलशेखरा आणि दिलशान यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. हेरथने ३ तर कुलशेखराने २ गडी बाद केले. माफक टार्गेट असल्याने श्रीलंकेला जिंकण्याची अधिक संधी आहे.