भारतात 'फेसबुक' युजर्सची संख्या आता ५ कोटी

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने प्रसिद्ध केलं आहे की फेसबुक वापरणाऱ्या भारतीयांची संख्या आता ५ कोटी झाली आहे. २०१० मध्ये ही संख्या ८० लाखांच्या घरात होती. अधिकांश भारतीय मोबाइल फोनद्वारे फेसबुक वापरतात.

Updated: Jul 25, 2012, 11:38 PM IST

www.24taas.com, हैद्राबाद

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने प्रसिद्ध केलं आहे की फेसबुक वापरणाऱ्या भारतीयांची संख्या आता ५ कोटी झाली आहे. २०१० मध्ये ही संख्या ८० लाखांच्या घरात होती. अधिकांश भारतीय मोबाइल फोनद्वारे फेसबुक वापरतात.

फेसबुकच्ये भारतीय ऑनलाइन विभागाच्ये प्रमुख कीर्तीगा रेड्डी म्हणाले, “अमेरिकेतील बहुतेक लोक डेस्कटॉपवरून मोबाइलकडे वळले आहेत. हिच गोष्ट आता भारतातही होऊ लागली आहे. यामुळे आम्हाला आमच्या मॉडेलबद्दल पुन्हा विचार करावा लागणार आहे.”

प्रथम मोबाइलवरूनच फेसबुक पाहाणारे लोक डेस्कटॉपकडे वळतच नाहीत. यामुळेच फेसबुकला कित्येक नवी ऍप्स निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळालं. मोबाइलवर फेसबुक वापरणाऱ्या युजर्सवर आता फोकस करून फेसबुक युजर्सची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.