कलमाडी लढणार पुन्हा लोकसभा

पुणे महापालिकेत झालेल्या रणकंदनावर अखेर सुरेश कलमाडीही बोलले. पुण्याचा विकास करताना मला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीपासून मी दूर होतो, सक्रीय असतो तर काय झाले असते याचा सगळ्यांनाच अंदाज आहे, असं सांगत पुढची निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला.

Updated: Jun 11, 2012, 08:29 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुणे महापालिकेत झालेल्या रणकंदनावर अखेर सुरेश कलमाडीही बोलले. पुण्याचा विकास करताना मला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीपासून मी दूर होतो, सक्रीय असतो तर काय झाले असते याचा सगळ्यांनाच अंदाज आहे, असं सांगत पुढची निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला.

 

पुण्याचे काँग्रेसचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुणे महापालिकेतल्या भेटीनं आज महापालिका परिसरात रणकंदन झाले.  एकीकडे ढोलताशे घेऊन स्वागतासाठी जमलेले कलमाडी समर्थक आणि दुसरीकडे कलमाडींना विरोध करत निषेधासाठी जमलेले भाजप-मनसेचे कार्यकर्ते.

 

दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर आले आणि मग महापालिका आवारात जोरदार रणकंदन झाले. कॉमनवेल्थ गेम घोटाळ्यात अटक झाल्यापासून कलमाडी पुण्याच्या राजकारणापासून दूरच होते. आज अचानक त्यांनी महापालिकेचा दौरा करताच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले. कलमाडी समर्थक आणि विरोधकांत त्यावरून जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पुणे महापालिकेत झालेल्या रणकंदनावर अखेर कलमाडीही बोलले. पुण्याचा विकास करताना मला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीपासून मी दूर होतो, सक्रीय असतो तर काय झाले असते याचा सगळ्यांनाच अंदाज आहे, असं सांगत पुढची निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला

 

तब्बल दोन वर्षांनंतर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी महापालिकेत आले. कलमाडींना कॉमन वेल्थ घोटाळा प्रकऱणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलय. त्यामुळं महापालिकेत त्यांच्या सोबत कोण उपस्थित राहणार याकडं लक्ष लागलं होतं. कलमाडी गेल्या वर्षभरापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र ते पडद्यामागून सूत्रं हलवतंच होते. त्यामुळं आजचा त्यांचा महापालिकेतला प्रवेश म्हणजे पुण्याच्या राजकारणात कमबॅक असल्याचं बोललं जातय. दरम्यान, मनसे, भाजपनं कलमाडींचा निषेध केला.

 

पुणे महापालिकेत सुरेश कलमाडी यांच्या प्रवेशावरुन भाजप आणि मनसेनं गोंधळ घातला. नगरसेवकांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करत कलमाडींचा निषेध केला. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या खासदार सुरेश कलमाडींच्या महापालिका प्रवेशाला मनसे आणि भाजपनं विरोध करत महापालिका परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. तर कलमाडी महापालिकेत आले तेव्हा त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. त्यामुळं तिन्ही पक्षांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला.