आळंदीत विठूचा जयघोष

ज्ञानोबा-माऊली-तुकाराम...असा जयघोष करत आळंदीमध्ये पंढरपूरच्या वारीसाठी लाखो भाविक दाखल झालेत. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे.

Updated: Jun 11, 2012, 08:09 PM IST

www.24taas.com, आळंदी

 

ज्ञानोबा-माऊली-तुकाराम..असा जयघोष करत आळंदीमध्ये पंढरपूरच्या वारीसाठी लाखो भाविक दाखल झालेत. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे.

 

माऊलींच्या पालखीत सहभागी होण्यासाठी अलंकापुरी वारक-यांनी गजबजून गेलीये. राज्यभरातून हजारो भाविक आळंदीत दाखल झालेत. पालखी प्रस्थानाचा हा सोहळा याची देही, याची डोळा अनुभवण्यासाठी भाविकांनी आळंदीत एकच गर्दी केली आहे.

 

पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात. दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत पालखीपुढे चालणा-या मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी चारच्या दरम्यान वीणा मंडपातून पालखी प्रस्थान ठेवणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी माऊलींच्या पालखीचा आळंदीत दोन दिवस मुक्काम असणार आहे.