आमच्यात 'फूट' सब 'झूठ' - अण्णा

टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याचा खळबळजनक खुलासा न्यूयॉर्क टाईम्सनं केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी पुकारलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्सनं घेतलेली अण्णांची मुलाखत नुकताच प्रसिद्ध झाली.

Updated: Oct 6, 2011, 01:08 PM IST

झी 24 तास वेब टीम, राळेगणसिद्धी 

 

टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याचा खळबळजनक खुलासा न्यूयॉर्क टाईम्सनं केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी पुकारलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्सनं घेतलेली अण्णांची मुलाखत नुकताच प्रसिद्ध झाली. प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते चांगले लोक असून आपण त्यांच्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं अण्णांनी म्हटंल आहे.  दरम्यान न्यूयॉर्क टाईम्सनं मतभेदांबाबत दिलेल्या वृत्ताचा अण्णांनी इन्कार केलाय. हा टीममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचं अण्णांनी म्हंटल आहे

 

[caption id="attachment_1883" align="alignleft" width="225" caption="अण्णांनी न्यूयॉर्क टाईम्सवर साधला निशाणा"][/caption]

टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताचा अण्णा हजारेंनी इन्कार केला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नसून विरोधकांचा फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोपही अण्णांनी केलाय. टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाईम्सनं दिलं होतं. सरकारकारशी सुरू असलेल्या चर्चेबाबत अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्याकडून अण्णांना योग्य ती महिती दिली जात नसल्याचा गौप्यस्फोट अण्णांनी केल्याचं या वृत्तांत म्हटलंय.

 

मात्र, अण्णांनी या वृत्ताचा स्पष्टपणे इन्कार केलाय. न्यूयॉर्क टाईम्स आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असून रेकॉर्ड केलेल्या टेप्स पुन्हा ऐकवण्याचं आव्हान अण्णांनी दिलयं.