शिख संत तेजासिंग, बारबाला आणि सेक्स पॉवर कॅप्सुल्स

होशियारपूर जिल्ह्यातील बुल्लोवाल- नंदचोड मार्गावरील आनंदगड येथे शहिद सिंघा मठात पंथाचे संत बाबा तेजा सिंग यांना पंजाब पोलिसांनी एका डान्सरसोबत रंगेहात अटक केले. या मठातून दारू आणि सेक्स पॉवर वाढवण्याच्या कॅप्सूलही जप्त करण्‍यात आल्या आहेत.

Updated: Jul 10, 2012, 03:29 PM IST

www.24taas.com, चंदिगढ

 

होशियारपूर जिल्ह्यातील बुल्लोवाल- नंदचोड मार्गावरील आनंदगड येथे शहिद सिंघा मठात पंथाचे संत बाबा तेजा सिंग यांना पंजाब पोलिसांनी एका डान्सरसोबत रंगेहात अटक केले. या मठातून दारू आणि सेक्स पॉवर वाढवण्याच्या कॅप्सूलही जप्त करण्‍यात आल्या आहेत. या प्रकरणी बलजिंदर सिंग आणि डान्सर मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

होशियारपूर येथील सत्कार समितीला या प्रकरणाचा आधीपासूनअंदाज आला होता. शहिद सिंघा मठात मुलींना आणून अय्याशी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे या मठावर काही सदस्य लक्ष ठेवून होते.  मठात सोमवारी एका मुलीला आणि तरुणाला येताना सत्कार समितीच्या सदस्यांनी पाहिले. त्यानंतर बुल्लोवाल पोलिसांनी सत्कार समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई केली.

 

एसएचओ गुरविंदर सिंग यांनी सांगितले की, संत बाबा तेजा सिंगला एका स्त्रीसोबत रंगेहात पकडले आहे. ही स्त्री विवाहित असून तिचा पती आणि मुले दिल्लीत राहतात. ती एका क्लबमध्ये डान्सर आहे. या प्रकरणामुळे होशियारपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली.