साक्षीची दुर्देवी कहाणी!

नवऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर पत्नीनं धारदार शस्त्रानं मुली ठार केलंच पण यानंतर तिनंही आत्महत्येचा प्रयत्न केला. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं तिनं जबानीत म्हटलंय.

Updated: Jul 10, 2012, 01:13 PM IST

www.24taas.com, अमृतसर 

 

नवऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर पत्नीनं धारदार शस्त्रानं मुली ठार केलंच पण यानंतर तिनंही आत्महत्येचा प्रयत्न केला. सासरच्या  जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं तिनं जबानीत म्हटलंय.

 

साक्षी आणि रमेश या विवाहित जोडप्याला लग्नानंतर अनेक वर्ष अपत्य प्राप्ती झाली नाही. त्यामुळे रमेशनं त्याच्याच भावाच्या मुलीला दत्तक घेतलं. दोन दिवसांपूर्वी रमेशनं आपल्या दत्तक मुलीवरच बलात्कार केला होता. ही गोष्ट साक्षीला समजताच तिनं पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ रमेशला अटक केली. या सर्व घटनेला साक्षीच्या सासरच्या लोकांनी साक्षीलाच जबाबदार धरलं आणि ही घटना पोलिसांपर्यंत नेल्यामुळे कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी साक्षीवर केला. या जाचाला कंटाळून साक्षीनं आपल्या दत्तक मुलीला ठार मारून स्वत: ही आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

साक्षीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेलं जात असताना साक्षीनं सासरच्या लोकांनी आपला छळ केल्याचं सांगितलं. रमेशला तुरुंगात धाडल्यानंतर सासरच्या लोकांनी तिला हा खटला मागे घेण्यासाठी तिच्यावर हरएक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचं तिनं यावेळी पोलिसांना सांगितलं. या जाचाला कंटाळून साक्षीनं आपल्या दत्तक घेतलेल्या चिमुरडीचं जीवन संपवलं आणि स्वत:ची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी साक्षीवर आयपीसी सेक्शन ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा आणि ३०९ अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केलाय.