www.24taas.com, नवी दिल्ली
उपराष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार म्हमून हमीद अन्सारींनी अर्ज दाखल केलाय. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि युपीएतल्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र यावेळी तृणमुल काँग्रेसचा एकही प्रतिनिधी हजर नव्हता.
७५ वर्षीय अन्सारींना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालीय. ७ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होतेय. अन्सारी यांच्या विरोधात एनडीएनं जसवंत सिंह यांना मैदानात उतरवलंय. मात्र संख्याबळ पाहता अन्सारींना विजयाची संधी आहे. युपीएतल्या घटक पक्षांसाठी युपीएतर्फे स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची ती लंच डिप्लोमसी होती. या लंच डिप्लोमसीमध्ये युपीएतील सर्व घटक पक्ष सहभागी झाले होते. याआधी तृणमूलकडून सहभागाविषयी प्रश्नचिन्ह होतं. मात्र एक खासदार या लंचला उपस्थित होता.
.