'चिकनी चमेली', 'मेहेबूबा'वर बेतलेली!

ऊर्मिला, मल्लिकानंतर कतरिना हेलनप्रमाणे आपली अदा दाखवताना दिसणारेय. 'अग्निपथ' सिनेमाच्या रिमेकमध्ये कतरिना 'चिकनी चमेली' हे आयटम नंबर करतेय. हे आयटम नंबर हेलन यांच्या मेहबूबा गाण्याप्रमाणेच चित्रित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

Updated: Nov 22, 2011, 01:52 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

'शोले' सिनेमातील हेलनचा हा डान्स नंबर अजरामर ठरला. या अरेबिक गाण्यावर हेलनने केलेला पदन्यास कोणीही विसरू शकत नाही. आर डी बर्मन यांचं संगीत, हेलनचा अफलातून डान्स फॉर्म हे सारं काही प्रेक्षक अनेक दशकानंतरही विसरू शकलेले नाही.

 

या गाण्यावर थिरकण्याची संधी मल्लिका शेरावत आणि ऊर्मिला मातोंडकरलाही मिळाली. 'आप का सूरुर'मध्ये मल्लिका शेरावत या गाण्यावर थिरकली तर त्या पाठोपाठच आलेल्या 'राम गोपाल वर्मा की आग' या सिनेमामध्ये ऊर्मिला मातोंडकरने या अजरामर गाण्यावर आपला जलवा दाखवला. या गाण्यामुळे या दोघींमध्ये कलगी तुरा रंगला. मल्लिकाचा बोल्ड अंदाज आणि ऊर्मिलाचा जबरस्त पदन्यास यामुळे या दोघींमध्ये तुलना झाली. मात्र या दोघींपेक्षाही प्रेक्षकांना भावलं ते हेलनचाच डान्स.

 

आता ऊर्मिला आणि मल्लिकानंतर कतरिना कैफ हेलनप्रमाणे आपली अदा दाखवताना दिसणारेय. 'अग्निपथ' सिनेमाच्या रिमेकमध्ये कतरिना 'चिकनी चमेली' हे आयटम नंबर करतेय आणि हे आयटम नंबर हेलन यांच्या मेहबूबा गाण्याप्रमाणेच चित्रित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. शीला की जवानी या हिट नंबरवर थिरकून कतरिनाने याआधीच आपली क्रेझ निर्माण केलीय मात्र हेलनप्रमाणे नृत्य करणं म्हणजे कतरिनासाठी नवं आव्हानच असणार आहे.  हे आव्हान स्वीकारण्यास कतरिना कितपत यशस्वी होते हे लवकरच कळेल.