आता आशुतोष- बिग बी एकत्र

'खेलें हम जी जानसे' या सिनेमानंतर आता आशुतोष गोवारीकर आपल्या नव्या सिनेमामध्ये व्यग्र झालाय. आणि या सिनेमामध्ये आशुतोष 'बिग बी' अमिताभ बच्चनसह काम करतोय. या सिनेमाबाबत आशुतोष खूपच एक्साईटेड आहे.

Updated: Nov 22, 2011, 01:53 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

'खेलें हम जी जानसे' या सिनेमानंतर आता आशुतोष गोवारीकर आपल्या नव्या सिनेमामध्ये व्यग्र झालाय. आणि या सिनेमामध्ये आशुतोष 'बिग बी' अमिताभ बच्चनसह काम करतोय. या सिनेमाबाबत आशुतोष खूपच एक्साईटेड आहे.

 

आशुतोष गोवारीकरनं जोधा अकबर हा ऐतिहासिक सिनेमा ऐश्वर्या बच्चनसह केला. त्याला प्रचंड यशही मिळालं. त्या नंतर आशुतोषनं 'खेलेंगे हम जी जान से' या सिनेमातून अभइषेक बच्चनला आपल्या सिनेमात कास्ट केलं. आणि पहिल्यांदाच आशुतोष बिग बी अमिताभ बच्चन सह काम करणारेय त्याच्या आगामी सिनेमासाठी. या सिनेमात अमिताभ डिटेक्टिव्ह अर्थात गुप्त हेराच्या भूमिकेत आपल्याला दिसणारेत.इतंकच नाही तर अमिताभ, अभिषेक ऐशव्यर्या यांच्यानंतर संपूर्ण बच्चन फॅमेली सोबत आपल्याला काम करायला नक्कीच आवडेल अशी आशा आशुतोषनं व्यक्त केली आहे.

 

आशुतोषनं डायरेक्ट केलेला अमिताभचा डिटेक्टीव्ह कधी आपल्याला भेटीला येणार याची प्रतीक्षा तर आहेच पण आशुतोषनं सांगतिल्या प्रमाणेच तो संपूर्ण बच्चन फॅमेलीसह कोणता सिनेमा आणतो याचीही उत्सुकता आहे. इतंकच नाही तर अमिताभ, अभिषेक ऐश्वर्या यांच्यानंतर संपूर्ण बच्चन फॅमेली सोबत आपल्याला काम करायला नक्कीच आवडेल अशी आशा आशुतोषनं व्यक्त केलीय.

Tags: