भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीकडून नोटीस का? नाना पटोलेंचा सवाल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकरणानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरू आहे.

Updated: Aug 30, 2021, 02:28 PM IST
भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीकडून नोटीस का? नाना पटोलेंचा सवाल  title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकरणानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरू आहे.  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशीम इथल्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवल्यामुळे काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीच्या नोटासा का? असा नाना पटोले यांनी केला आहे. 

नाना पटोले म्हणाले, 'मला भाजपला आणि ईडीला एक प्रश्न विचारायचा आहे.  भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. चुकीचं केलं असेल तर कारवाई झाली पाहिजे. पण भाजपतील सगळे दुधाने धुतलेले आहेत का? भाजपच्या लोकांवर कारवाई का होत नाही. असं पटोले म्हणाले. 

 'किरीट ज्याची तक्रार करतील त्यांच्यावर कारवाई करतात. गडबड केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जावी, पण भाजपत असं कुणी नाही का?'  असं म्हणत नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सध्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशीम इथल्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी सुरू केली आहे. तर अनिल परब मंगळवारी सकाळी 11 वजाता ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.