'तुझं बाळ काही...', अमित शाहांनी मंदिरातच सर्वांसमोर जय शाहांना झापलं! पत्नी बघत राहिली; पाहा Video

Amit Shah Scolds Jay Shah Watch Video: यापूर्वीही अमित शाहांनी जय शाहांना चारचौघात सुनावलं होतं. आता नेमकं काय घडलंय एकदा पाहाच...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 16, 2025, 07:19 AM IST
'तुझं बाळ काही...', अमित शाहांनी मंदिरातच सर्वांसमोर जय शाहांना झापलं! पत्नी बघत राहिली; पाहा Video title=
मंदिरात घडला हा सारा प्रकार

Amit Shah Scolds Jay Shah Watch Video: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाह हे त्यांचा मुलगा जय शाह यांना झापताना दिसत आहेत. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी असलेल्या आपल्या मुलाला शाह यांनी चारचौघांमध्येच खोचक टोला लगावत दोन शब्द सुनावल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील एका मंदिरामध्ये पुजेनंतर हा सारा प्रकार घडला. सध्या शाह पिता-पुत्राचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओत काय आहे?

जगन्नाथ मंदिरातील पुजा झाल्यानंतर सर्वांना आरती देण्यात आली. अमित शाह यांनी स्वत: मंदिरामधील गोमातेची पुजा केल्याने त्यांच्या हातातच आरतीचं ताट होतं. त्यांनी काही महिन्यांचं वय असलेल्या आपल्या नातवाला आरतीमधील दिव्याची उब पोहचावी म्हणून जय शाहांच्या कुशीत असलेल्या नातवाजवळ ताट नेलं. त्यावेळेस जय शाह यांनी बाळाला थोडं मागे घेतलं. हे पाहताच अमित शाह लेकावर संतापले. त्यांनी रागातच जय शाह यांना दोन वाक्य सुनावली. जय शाहांना सर्वांसमोरच अमित शाहांनी झापल्याचं पाहून अमित शाहांच्या पत्नीलाही आश्चर्य वाटल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

जय शाहांनी आपल्या मुलाला मागे घेतल्यानंतर अमित शाहांनी गुजरातीमध्ये, "कासू नही थे,  तारे कोई नावो नये नो छोकरो छे," असं म्हटलं. म्हणजेच अमित शाहांनी जय शाहांना, "(त्याला) काहीच होणार नाही, तुझं बाळ काही नवीन नाही. तुझं बाळ काय जगाहून वेगळं आहे का?" असा प्रश्न चारचौघात विचारला. अमित शाहांचं हे रुप पाहून त्यांची पत्नीही आश्चर्यचित होत त्यांच्याकडे पाहता दिसत आहे. मात्र अमित शाह आपलं बोलणं झाल्यानंतर इतरांना आरती देण्यासाठी पुढे निघून जाताना दिसतात.

यापूर्वीही अशापद्धतीने झापलेलं

अमित शाह हे सध्या तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून वेगवेगळ्या प्रकल्पांची ते पाहणी करणार आहेत. उत्तरायणाच्या पार्श्वभूमीवर शाह कुटुंबाने जग्गनाथ मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतलं. त्याचवेळी हा सारा प्रकार घडला. यापूर्वीही जय शाह यांना अमित शाहांनी एका धार्मिक कार्यक्रमादरम्यानच झापलं होतं. त्यावेळेस जय शाह हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. पुजेदरम्यान जय शाहांचं लक्ष नसल्याचं पाहून अमित शाहांनी त्यांना 'पुजेकडे लक्ष दे' असं सांगितलं होतं.

साचेबद्ध भारतीय वडील

सोशल मीडियावर हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. अनेकांनी या व्हिडीओंवर कमेंट करताना अमित शाह हे अगदी साचेबद्ध भारतीय वडील आहेत, असं म्हटलं आहे. व्यक्ती कोणत्याही स्तराला गेली तर आपल्या मुलांना अशापद्धतीने ऐकवल्याशिवाय राहत नाही, असंही काहींनी म्हटलं आहे.