शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीची छापेमारी

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सध्या सुरू

Updated: Aug 30, 2021, 01:41 PM IST
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर  ईडीची छापेमारी title=

मुंबई : भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेला. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसूली संचालयाने अर्थात ईडीने (Enforcement Directorate) नोटीस पाठवल्यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशीम इथल्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी सुरू केली आहे.  एकंदर पाहाता शिवसेनेच्या नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकूण 5 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे. 

सध्या छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणांपैकी महिला प्रतिष्ठान, बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था, बीएएमएस कॉलेज, भानवा ऍग्रो प्रॉडक्ट याठिकाणा छापेमारी सुरू असल्याची सध्या माहिती मिळत आहे. एकून 100 कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी सध्या याठिकाणी छापेमारी सुरू आहे. यासर्व प्रकणामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जो वाद आहे तो अधिक रंगण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांना नोटीस कशासाठी? 
माजी गृहंमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सचिन वाझेने अनिल परब यांचंही नाव घेतलं होत. या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठीच ईडीने ही नोटीस बजावली आहे. त्यानुसार अनिल परबांना मंगळवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे.