Water Kingdom च्या मुकुटात पुन्हा एकदा मानाचा तुरा, सलग तिसऱ्यांदा प्रतिष्ठित मॅपिक पुरस्काराने सन्मान

 मनोरंजनासाठी, कुटुंबीय किंवा मित्रमंडळींसाठी आनंदाचे क्षण घालवण्याचं ठिकाण म्हणजे वॉटर किंगडम

Updated: Sep 25, 2022, 12:01 AM IST
Water Kingdom च्या मुकुटात पुन्हा एकदा मानाचा तुरा, सलग तिसऱ्यांदा प्रतिष्ठित मॅपिक पुरस्काराने सन्मान title=

मुंबई - मनोरंजनासाठी, कुटुंबीय किंवा मित्रमंडळींसाठी आनंदाचे क्षण घालवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे वॉटर किंगडम. भारतातील याच लोकप्रिय वॉटर किंगडमचा पुन्हा एकदा देशपातळीवर गौरव करण्यात आला आहे. गेल्या 20 वर्षांपासून आपल्या सर्वांनाच Water Kingdom ठाऊक आहेच. अशात याच आपल्या लाडक्या वॉटर किंगडमला यंदा पुन्हा एकदा देशातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. वॉटर किंगडमने सलग तिसऱ्यांदा देशपातळीवरील प्रतिष्ठित असा मॅपिक पुरस्कार पटकावला आहे.  इंडियाज मोस्ट एडमायर्ड रिटेल अवॉर्ड - ज्यूरीज चॉईस हा सन्मान वॉटर किंगडमला प्रदान करण्यात आला. मुंबईत 15 सप्टेंबर 2022 रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 

याबाबत बोलताना वॉटर किंगडमचे अध्यक्ष (बिझनेस डेव्हलपमेंट ) परेश मिश्रा  म्हणाले की, "वॉटर किंगडमला मिळालेल्या या प्रतिष्ठित पुरस्काराचा कंपनीला प्रचंड अभिमान आहे. वॉटर किंगडम लवकरच 24 वर्ष पूर्ण करणार आहे, अशात आम्हाला लेजर आणि एंटरटेनमेंट विभागातील Mapic India Jury’s Choice Award सलग तिसऱ्यांदा मिळाल्याचा आनंद आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांचं योग्य मनोरंजन करत राहण्याचा प्रयत्न करू."  

MAPIC India Retail Awards रिटेल विक्रेत्यांसाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.  

India’s most loved and favourite Family Entertainment destination, Water Kingdom won the Mapic, ‘India’s most admired retail Award 3rd consecutive year.