Actress : नेहमीच म्हटलं जातं की इंडस्ट्रीच्या बाहेरच्या लोकांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा सोपा नसतो. त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीविषयी बोलणार आहोत. जिचा या इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर नव्हतं आणि तिनं स्वत: ची जागा स्वत: निर्माण केली. ती कोणत्या चित्रपटातील कुटुंबातून नव्हती आणि बॉलिवूडमध्ये ओळख मिळवण्यासाठी तिला अनेक वर्ष लागले. तिला चित्रपट निर्मात्यांनी कुरुप म्हटलं होतं. त्याच अभिनेत्रीनं 400 कोटींचा ब्लॉकबस्टर असा चित्रपट दिला आणि मग टॉपची अभिनेत्री झाली. तर तिचा अखेरचा चित्रपट हा सात वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण तरी सुद्धा आजही ती लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे आणि तिचं लोकप्रियता कोणत्याही बड्या कलाकारापेक्षा कमी नाही.
अनुष्का अभिनेत्री होण्या आधी मॉडेल होती. यशराज फिल्म्सच्या 'बॅन्ड बाजा बारात' या चित्रपटातून अनुष्कानं एन्ट्री केली. या चित्रपटातून रणवीर सिंगनं देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उत्तर प्रदेशच्या अयोध्यातून आलेल्या कर्नल अजय कुमार शर्माची लेक अनुष्का ही बंगळुरुमध्ये मोठी झाली. तिनं माउंट कार्मेल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनुष्काला वायआरएफच्या आदित्य चोप्रानं सांगितलं की ती एक चांगली अभिनेत्री आहे. पण ती सगळ्यात सुंदर दिसणारी नाही. कॉफी विथ करणमध्ये अनुष्कानं या घटनेला आठवत सांगितलं की 'मला तुझ्या प्रतिभेवर खूप विश्वास आहे आणि मला वाटतं की तू खूप टॅलेंटेड आहेस पण मला हे वाटत नाही की तू खूप सुंदर दिसतेस, असं ते म्हणाले.'
हेही वाचा : 45 कोटींमध्ये बनवण्यात आला भारतातील सगळ्यात फ्लॉप सिनेमा; चित्रपटामुळे इंडस्ट्रीचं 99.99 % नुकसान
अनुष्कानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. 2014 मध्ये अनुष्कानं सगळ्यात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पीके' मध्ये काम केलं. या चित्रपटानं 400 कोटींची कमाई केली. दोन वर्षांनंतर अनुष्कानं सलमान खानच्या 'सुल्तान' मध्ये काम केलं आणि बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा बक्कळ कमाई केली. 'सुल्तान'नं भारतात 400 कोटीं पेक्षा अधिकची कमाई केली. ज्यामुळे ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री झाली. गेल्या काही वर्षांपासून अनुष्का ही तिच्या कुटुंबाकडे लक्ष देऊन आहे. तर लवकरच ती 'छक्कडा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे.