राणे म्हणजे राज्याला लागलेली पनवती - विनायक राऊत

राणे यांनी मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापऱ्यामुळे विनायक राऊत यांचं पंतप्रधानांना पत्र   

Updated: Aug 24, 2021, 10:40 AM IST
राणे म्हणजे राज्याला लागलेली पनवती - विनायक राऊत  title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर चांगलच राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर शिवसेना लोकसभा गटनेते आणि खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. राणेंना पक्षात घेऊन भाजपने भुताच्या हातात कोलित दिल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला  आहे. 

विनायक राऊत यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. 'राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले आहे. यामुळे मुख्यमंत्री पदाचा अपमान झाला. राणे म्हणजे राज्याला लागलेली पनवती आहे. भाजपनं भुताच्या हातात कोलित दिल आहे. याचा भाजपला पश्चात्ताप झाला असेल.'  असं राऊत म्हणाले. 

बातमी : http://नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद पेटला, शिवसेनेनं दिलं रोखठोख उत्तर

पुढे विनायक राऊत म्हणाले, 'राणे हे सिंह नाही तर कोल्हा आहे. बेजबाबदार केंद्रीय मंत्र्यांचे हे वक्तव्य आहे. यावर शिवसैनिक गप्प बसणार नाही. राणेंना अटक करायला पाहिजे. गुन्हे दाखल झाले ते योग्यच आहे..' राणे यांनी मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापऱ्यामुळे शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे.