मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी ४ वाजता मुंबईत आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित लता दिदी यांच्या घरीच जाण्याची शक्यता आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागली होती. मात्र, ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण, उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लता दीदी यांच्या निधनामुळे मी शब्दांच्यापलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरणे कठीण आहे. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून कायम स्मरणात ठेवतील. असे ट्विट करून पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.