बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधणार

शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर राज्य सरकारतर्फे त्यांना मानवंदना...  

Updated: Jan 23, 2022, 08:57 AM IST
बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधणार  title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज, रविवार (23 जानेवारी ) 96 वी जयंती आहे. जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. हा संवाद ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसैनिकांना आज काय मार्गदर्शन करतील, याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. आज रात्री आठ वाजता मुख्यमंत्री शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. 

आगामी माहापालिका निवडणुकीबद्दल शिवसेना पक्षप्रमुख पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. एवढंच नाही तर, जयंती निमित्त शिवसेना देशभरात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवणार आहे. 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर राज्य सरकारतर्फे त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. कोरोना परिस्थिती पाहाता शिवसैनिकांना गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.