मुंबईच्या जवळच आहे मिनी थायलंड! दिवसातून फक्त 30 मिनिटेच उघडते; तुम्ही बघितले का?

Travel Tips: जर तुम्हाला मुंबईतच्या जवळच मिनी थायलंडला भेट द्यायची असेल तर आम्ही अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. पण ही जागा फक्त  30 मिनिटे खुले असते. 

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 16, 2025, 11:45 AM IST
 मुंबईच्या जवळच आहे मिनी थायलंड! दिवसातून फक्त 30 मिनिटेच उघडते; तुम्ही बघितले का?  title=
Photo Credit: @maha_tourism/ X

Mini Thailand: मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. याशिवाय मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे महानगर देखील आहे. मुंबईत काही नाही असं नाहीच. राजकीय ते मनोरंजन क्षेत्र सगळ्याचं साठी मुंबई प्रसिद्ध आहे. हे शहर जितके ग्लॅमरसाठी प्रसिद्ध आहे तितकेच येथील समुद्रकिनारे आणि बेटेही तितकेच लोकप्रिय आहेत. मुंबईत आणि मुंबईच्या जवळ असलेल्या अनेक ठिकाणी जिथे फिरायला जातात. इथे अनेक बीचेस प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की मुंबईच्या जवळच मिनी थायलंड (Devbagh Maharashtra) आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रात थायलंडचा फील घ्यायचा असेल तर तुम्ही जर या जागेला नक्कीच भेट द्या. सुट्टीत महाराष्ट्रात फिरण्याचा विचार करत असाल तर यावेळी हे आयलंड पाहायला विसरू नका.

कुठे आहे मिनी थायलंड?

मुंबईजवळील मिनी थायलंड म्हणजे सीगल आयलंड (Seagull island devbag). हे बेट मुंबईतील देवबाग स्थळाच्या दरम्यान समुद्रात आहे. निसर्ग आणि अ‍ॅडव्हेंचर आवडत असलेल्या लोकांसाठी हे स्वर्गापेक्षा कमी नाही. निसर्गाची आवड असलेले लोक येथे भेटायला येतात. हे मुंबई नजीकचे ऑफबीट डेस्टिनेशन आहे. चला आज आम्ही तुम्हाला या बेटाची खासियत सांगणार आहोत. 

हे ही वाचा: Photo: 100 वर्षे जुना ट्रेनचा डबा 2.5 लाख रुपयांना केला खरेदी, त्यापासूनच आता वर्षाला होतेय 1 कोटी रुपयांची कमाई

 

सीगल बेटाचे खास वैशिष्ट्य

हे बेट इतर बेटांपेक्षा थोडे वेगळे आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे ते दिवसातून फक्त 30 मिनिटेच उघडते. देवबाग बीचच्या टोकापासून तुम्ही या बेटावर चालत जाऊ शकता. त्याची पाण्याची पातळी कमाल ३ फूट आहे.

कसं जायचं या बेटावर?  

या बेटावर जायचे असेल तर बोटीची मदत घ्यावी लागेल. येथे जाण्यासाठी बोटीचे 500-800 रुपये मोजावे लागतात. तथापि, येथे आपण थोडीशी बार्गेनिंग करू शकता.

हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

 

 

हे बेट गावापेक्षा आहे लहान 

हे बेट खूपच लहान पण सुंदर आहे. पाहिल्यास कोणत्याही गावापेक्षा ते खूपच लहान आहे. हे स्वच्छ निळे पाणी आणि सभोवतालच्या समुद्राच्या बाजूंसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे येऊन सूर्यस्नान करू शकता आणि मासेमारी सारख्या अनेक अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये देखील सहभागी होऊ शकता.

हे ही वाचा: भारताचा सर्वात फ्लॉप हिरो! 13 वर्षात दिले 11 फ्लॉप चित्रपट, आता करतायेत करोडोंची कमाई

 

का आहे सीगल हे नाव? 

या बेटाचे नाव सीगल असण्यामागे एक कारण आहे. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील. पण हे बेट सीगल्ससारख्या विदेशी पक्ष्यांचे घर आहे. त्यामुळे या बेटाला सीगल म्हणतात. या शिवाय याची ओळख मिनी थायलंड असं आहे.