सैफच्या घरात खरंच चोर घुसला की आणखी कोणी..., सत्य काय? पोलीस, अभिनेत्याच्या टीमच्या जबाबात तफावत का?

Saif Ali Khan Stabbed: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 16, 2025, 12:06 PM IST
सैफच्या घरात खरंच चोर घुसला की आणखी कोणी..., सत्य काय? पोलीस, अभिनेत्याच्या टीमच्या जबाबात तफावत का? title=
saif ali khan stabbed 6 times at bandra home all we need to know the case

Saif Ali Khan Stabbed: वांद्रेतील उच्चभ्रू वस्तीत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचे घर आहे. याच घरात मध्यरात्री दोनच्या सुमारास सैफवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र सैफ अली खानच्या घरात हल्लेखोर व्यक्ती कसा घुसला? असा सवाल उपस्थित होत आहेत. मात्र या केसमध्ये पोलिसांचा जबाब आणि सैफच्या टीमचा जबाब यात तफावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई पोलिस झोन 9चे डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. ज्यावेळी घटना घडली तेव्हा अभिनेत्याचे काही सदस्य घरात उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकू हल्ल्यात सैफ जखमी झाला होता. त्याला गंभीरवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सैफ अलीखानवर चोरीच्या उद्देशानू चाकू हल्ला झाला होता का? असा सवाल केला असता पोलिसांनी यावर अधिक उत्तर न देता. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून वांद्रे पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. 

वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ यांच्या घरात काम करणारी महिला कर्मचारी अरियामा फिलिफ्स हिच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. तेव्हा तिने आरडाओरडा केला. आवाज ऐकून सैफ त्याच्या रूममधून बाहेर आला तेव्हा त्यांने हस्तक्षेप केला. तेव्हा अज्ञात व्यक्ती अधिक आक्रमक झाला आणि त्याने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफ आणि महिला कर्मचारी दोघेदेखील गंभीर जखमी झाले आहेत. 

सैफ आणि करिनाच्या टीमने काय म्हटलं?

सैफ अली खान आणि करिनाच्या टीमनेदेखील या हल्ला प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. करीना कपूरच्या टीमने म्हटलं आहे की, सैफच्या हाताला जखम झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कुटुंबातील इतर सदस्यांना कोणतीही इजा झाली नाही. तर, सैफच्या टीमकडूनही एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे, त्यानुसार, सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. त्यात तो जखमी झाला असून लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होत आहे. हे प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.