पहिलं अंड की पहिली कोंबडी! भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा

'भाजपच्या जन्माआधीच शिवसेनेचा नगरसेवक मुंबईत निवडून आला होता'

Updated: Jan 24, 2022, 04:04 PM IST
पहिलं अंड की पहिली कोंबडी! भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा title=

मुंबई : पक्षाच्या जन्मावरुन आता शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. १९८४ ला लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढविली होती शिवसेनेच्या नाही, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं होतं. याला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'भाजपने दाखला आणावा'
भाजपाच्या जन्मकर्त्याचा दाखला जर त्यांनी आणला, तर उत्तर देणं सोप होईल, लोकांना कळेल की भारतीय जनता पक्ष कधी जन्माला आला आणि शिवसेनेचा जन्म कधी झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा जन्म कधी?
भारतीय जनता पक्षचा जन्म हा १९८० च्या दशकात झाला. जनता पक्षाचं पतन झाल्यावर.  आणि शिवसेनेचा जन्म हा १९६९ साली झाला. शिवसेनेचे पहिले महापौर हे या मुंबई शहरात डॉक्टर हेमचंद्र गुप्ते हे कधी झाले, आमचे किती नगरसेवक निवडून आले. यासंदर्भातलं एखादं अभ्यास शिबिर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेऊ, आणि कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर येऊ द्या, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे पहिले आमदार
शिवसेनेचे पहिले आमदारही त्याचकाळात निवडून आले वामनराव महाडिक शिवसेनेच्या स्थापनेनंतर. गिरगावातून प्रमोद नवलकर निवडून आले होते, आमचे आमदार म्हणून. माझगावातून छगन भुजबळ निवडून आले होते, आमचे वाघ मुंबईतून निवडून आले आहेत, भारतीय जनता पक्षाच्या जन्माआधी. 

'फडणवीस यांचा मुंबईशी संबंध नाही'
देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हा मुंबईशी फारसा संबंध नसेल, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल, या सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या जन्माच्या आधीच्या आहेत.

इतिहास आहे, दस्तऐवज आहे, जे कोर्ट निर्माण झालं त्यावेळचे साक्षीपुरावे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साक्ष आहे. 

शेकडो कारसेवक त्यावेळी मुंबईतून गेले, त्यांना कोणताही राजकीय पक्ष तेव्हा नव्हता, अनेक प्रमुख लोकं आमचे त्यावेळी गेले होते. तुम्ही जर त्याकाळातला सामना पाहिलात, तेव्हा कोण कोण कुठून निघालेत, याची यादीच आम्ही दिली होती.  

संपूर्ण मॉनेटरिंग हे मुंबईतून होत होतं, सेनाभवनात वॉररुम होती त्यावेळी. तेव्हा कोणाला काही माहिती द्यायची असेल तर आणि कितीही माहिती पसरवली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही.

शिवसेनेचे योगदान ऐतिहासिक
कारण अयोध्यातील लढ्यातलं शिवसेनेचं योगदान, हे ऐतिहासिक आहे, इतकंच काय तर जेव्हा राम जन्म भूमीचा लढा थंड पडला होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अयोध्येला गेलो होतो आणि वातावरण पुन्हा एकदा जागृक केलं, सरकारला जाग आणली. अयोध्येशी आमचा काय संबंध हे रामाला माहित आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.