मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांची कन्या पुर्वशी राऊत हिचा साखरपुडा नुकताच पार पडला. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा संपन्न झाला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पूत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी तिचे लग्न ठरलंय. या सोहळ्याला राऊत परिवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती पहायला मिळाली. याचा भव्य सोहळा संध्याकाळी पार पडणार असून त्यावेळच्या यादीच बड्या नेत्यांची नावे आहेत.
मल्हार नार्वेकर यांचे वडील आणि संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी काम पाहीले असून 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून सुद्धा काम केलंय.
संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या सोहळ्यास राजकीय मान्यवर आणि दिग्गज मंडळी साखरपुड्याला हजेरी लावणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील प्रमुख राजकीय नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.