मुंबईत काँग्रेस आमदारांकडून शिवसेना उमेदवाराचा प्रचार

दक्षिण मध्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी सहभाग घेतला. 

Updated: Apr 17, 2019, 04:19 PM IST
मुंबईत काँग्रेस आमदारांकडून शिवसेना उमेदवाराचा प्रचार title=

मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी सहभाग घेतला. ऐन निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंसोबत कालिदास कोळंबकर दिसल्यामुळे, दक्षिण मध्य मुंबईतले काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसचे फक्त दोनच आमदार आहेत. त्यापैकी कालिदास कोळंबकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वडाळा इथल्या जनसंपर्क कार्यालयातही कोळंबकरांनी राहुल शेवाळेंचे स्वागत केले. कालिदास कोळंबकर, काँग्रेस आमदार राहुल शेवाळे, दक्षिण-मध्य मुंबई महायुती उमेदवार आहेत.