ये दोस्ती.... हम नही तोडेंगे... संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे

Updated: Jul 27, 2020, 10:23 AM IST
ये दोस्ती.... हम नही तोडेंगे... संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा title=

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आपण आमच्या आयुष्यात खास आहात. आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

'पॉवर' स्टेअरिंग हाती घेत अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

संजय राऊत यांनी नुकतीच दैनिक 'सामना'साठी उद्धव ठाकरे यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली होती. ही मुलाखत सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडण्यात आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती. भाजपने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला नाकारल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू सातत्याने लावून धरली. भाजपने अनेक मार्गांनी शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचा प्रत्येक वार पलवटून लावला. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकासआघाडी प्रत्यक्षात आकार घेण्यास पुरेसा कालावधी मिळाला. यानंतरही संजय राऊत यांनी अनेकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. 

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत