ज्याची भिती आहे तेच घडतंय! भारतातील 'हे' ठिकाण डेंजरझोनमध्ये; हळू हळू समुद्रात बुडतंय

Kerala Sea Surge : 2050 पर्यंत मुंबईसह भारतातील काही शहर समुद्रात बुडण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. यापैकी एक शहर हे आता डेंजर झोनमध्ये आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 21, 2025, 10:57 PM IST
ज्याची भिती आहे तेच घडतंय! भारतातील 'हे' ठिकाण डेंजरझोनमध्ये; हळू हळू समुद्रात बुडतंय title=

Kerala Sea Surge Big Natural Disaster in 2050 : 2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील अनेक शहरं समुद्रात बुडणार असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. या दाव्यानंतर ज्याची भिती आहे तेच घडतयं. भारतातील एक ठिकाण डेंजरझोनमध्ये आले आहे. हे शहर  हळू हळू समुद्रात बुडत आहे. जाणून घेऊया हे शहर कोणते आहे. 

हे देखील वाचा... 'या' देशात सापडला पृथ्वीवरचा अत्यंत दुर्मिळ खजिना, किंमत 2100000000000 ! चीनसह सर्व देश हडबडले

केरळमधील किनाऱ्यावरचा परिसर हळू हळू समुद्र गिळंकृत करत आहे. केरळच्या समुद्र किनाऱ्यावरील अरियड, अझिकोडे, चेल्लनम, अंबालापुझा, पुरक्कड, कुझुप्पिल्ली आणि वडनापिल्ली हे परिसर धोकादायक स्थितीत आहेत.  केरळला 590 किमी लांबीची समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यापैकी 55 टक्के समुद्र किनाऱ्याची धूप झाली आहे. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन सर्व्हिसेस (INCOIS) नुसार केरळच्या 300 किमी किनारपट्टीला धूपचा फटका बसला आहे. कन्नूर, कोची, अलप्पुझा आणि कासारगोड सारख्या भागात दरवर्षी 6 मीटर अंतरावर समुद्राची धूप होत आहे.

तिरुअनंतपुरम, कोल्लम, मलप्पुरम आणि त्रिशूरच्या काही भागांमधील समुद्रकिनारे आधीच नाहीसे झाले आहेत. तर अनेक समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अरबी समुद्रातील तापमानवाढीमुळे चक्रीवादळाच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळतात. समुद्र किनाऱ्यावर आलेल्या वादळांमुळे हजारो घरे समुद्रात बुडाली आहेत.  केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (KUFOS) ने समुद्र किनारे धोकादायक स्थितीत असल्याचे सांगितले.   फक्त बदलते हवामानच नाही तर मानवनिर्मितीत समस्या देखील याला जबाबदार आहेत. मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. समुद्र किनाऱ्यांलगत मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले आहे. 

मुंबई आणि कोलकातासह भारतातील आणखी काही शहरांना समुद्रामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. सुरत, ओडिशा, केरळ, तामिळनाडू या शहरांचा धोकादायक यादीत समावेश आहे. 2050 पर्यंत समुद्र पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या 10 देशांच्या लोकसंख्येवर याचा प्रभाव होणार आहे. सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे.