मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालात 'महाजनादेश' मिळाला नसला तरी महाराष्ट्रात जनादेश हा युतीलाच मिळाला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील 'कमबॅक' केलं आहे. आघाडीने मिळून 100 चा आरडा गाठण्याचा प्रयत्न केला आहे. निकाल असा लागल्यावर सगळ्यांची उत्सुकता ही 'सामना'च्या अग्रलेखात होती.
'सामना' अग्रलेखात सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडेच अशी भूमिका मांडण्यात आली. आहे. 'ईव्हीएममधून फक्त कमळच नाही तर यावेळी जनादेश देणारा निकाल बाहेर आला आहे.' असं सामनामध्ये म्हटलं आहे. उतू नका, मातू नका नाहीतर माती होईल, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. अगदी गुरूवारी सकाळपर्यंत भाजपकडून '220 पार' असा नारा लगावला होता. पण भाजपला निकाल खूप मोठा धक्का बसला आहे. आयारामांना जनतेने पूर्णपणे नाकारलं आहे.
'युती'चा आकडा स्पष्ट बहुमताचा आहे. शिवसेना आणि भाजप मिळून 160 च्या आसपास आकडा आला आहे. महाराष्ट्रात 2014 पेक्षा वेगळा निकाल लागला आहे. 2014 ला 'युती' नव्हती. 2019 साली 'युती' असतानाही जागांची घसरण झाल्याचं 'सामना' अग्रलेखात म्हटलंय. काँग्रेस- राष्ट्रवादीचा शंभर जागांचा टप्पा गाठला. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून मतदारांनी आघाडीवर जबाबदारी टाकली आहे. हा एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना मिळालेला धडा आहे.
काँग्रेसला कोणतेही नेतृत्व नव्हते.त्या बिनधड्याच्या काँग्रेसला राज्यात 44-45 च्या आसपास जागा मिळाल्या. भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस अशी फोडली की, त्यांना पवारांचा पक्ष शिल्लक राहिल काय? असा माहोल निर्माण झाला. पण महाराष्ट्रात सर्वात जास्त उसळी राष्ट्रवादीने मारली आहे. निकालात शरद पवारांनी एक हाती विजय मिळवला आहे.