फडणवीसांचे सरकार पळून गेले, सामनातून टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्यानंतर आज 'सामना'तून पुन्हा एकदा भाजपला टार्गेट करण्यात आले आहे. 

Updated: Nov 27, 2019, 07:29 AM IST
फडणवीसांचे सरकार पळून गेले, सामनातून टीकास्त्र title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्यानंतर आज 'सामना'तून पुन्हा एकदा भाजपला टार्गेट करण्यात आले आहे. बहुमताला सामोरे न जाताच फडणवीस सरकार पळून गेल्याची टीका करण्यात आली आहे. भाजपच्या सगळ्या वल्गनाच हवेत विरल्या आहेत. शेवटी देवेंद्र फडणवीसांचे औटघटनेचे राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच कोसळले. ज्यांच्या भरवशावर सरकार स्थापन केले त्यांनाच आधी राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे या सरकारच्या नाट्याचा पडदा पडला. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांना पळविले आणि सरकार स्थापन केले. मात्र, अजित पवार सरकारमधून बाहेर पडले आणि फडणवीसांचे सरकार कोसळले.

महाराष्ट्राने दबाव झुगारला आणि आमदारांनी स्वाभिमान राखला. महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अगतिक का व्हावे, आम्ही १६२चा आकडा दाखवूनही तो खोटा ठरविण्याचा घृणास्पद प्रयत्न त्यांनी केला. आता बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीसांचे सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची आणि राजकीय पक्षाची झाली नव्हती. अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात आपले वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली आहे. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता ठाकरे सरकारच्या काळात सर्व शुभ घडेल, असे संकेत अग्रलेखातून देण्यात आले आहे.

भाजपच्या सगळ्या वल्गनाच हवेत विरल्या आहेत. शेवटी देवेंद्र फडणवीसांचे औटघटनेचे राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच कोसळले. भ्रष्ट आणि बेकायदा मार्गाने महाराष्ट्राच्या बोकांडीवर बसलेले सरकार फक्त ७२ तासांत गेले. जनतेचा रेटा होताच, पण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने राजभवनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. चोवीस तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आणि फडणवीसांचे बेकायदेशीर पद्धतीने स्थापन झालेलेल सरकार गडगडेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हती. बहुमताचा आकडा नसताना फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा पहिला गुन्हा आणि ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा. या गुन्ह्यांसाठी जागा निवडली मुंबईच्या राजभवनाची. जेथे संविधानाचे रक्षण व्हावे, त्या संविधानाच्या संरक्षकांनीच या गुन्ह्यांस कवच दिले.

 उद्धव ठाकरेंचा शपथविधी

दरम्यान, २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंचा शपथविधी होणार आहे. शिवतीर्थावर हा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. राज्यभरातून आलेले आमदार सध्या मुंबईतच असल्याने लगेचच शपथविधी उरकला जाणार आहे. शिवाय आजच मंत्रिपदाचं वाटप जाहीर होणार असल्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सांगितले. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्य़ासाठी आज सकाळी ८ वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील.. सकाळी ८ वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 

आज विशेष अधिवेशन

नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्य़ासाठी आज सकाळी ८ वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील.. सकाळी ८ वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.