'ताज'वर मेहरबान पालिकेची 'बीएसई'वर कारवाई

 या कारवाईनंतर पालिकेवर टीकेची झोड उठतेय. 

Updated: Jan 4, 2021, 01:51 PM IST
'ताज'वर मेहरबान पालिकेची 'बीएसई'वर कारवाई title=

मुंबई : मुंबई महापालिकेने मुंबई स्टॉक एक्स्चेंजला (बीएसई) दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. यानंतर पालिकेवर टीकेची झोड उठतेय. कारण ताज हॉटेलला ९ कोटींचा दंड पालिकने माफ केल्याचे वृत्त काही दिवसांपुर्वीच समोर आले होते. पण ही रक्कम मनपा अधिकाऱ्यांनी परस्पर संगनमत करून ६२ लाखांवर आणल्याचा आरोप रवी राजा यांनी केला होता. 

तसेच ट्रायडंट हॉटेलने २० लाख रुपये भरुन कारवाई टाळत सुटका करुन घेतल्याचेही समोर आले. या पार्श्वभुमीवर बीएसईकडून दंडाची पूर्ण रक्कम घेतली जाणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

मुंबईत २६/११ च्या दहशतावादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेल व्यवस्थापनाने ताज आणि ट्रायडंट समोरील पालिकेचा रस्ता ताब्यात घेतला. त्यानंतर इथे खासगी वाहनांना पार्किंगसाठी मनाई करण्यात आली होती. मात्र याच रस्त्याचा वापर ताज हॉटेल खासगी पार्किंगसाठी करत असल्याचे ते म्हणाले. पाच वर्षांपासून सुरु असलेला वाद पालिकेने 'ताज'कडून ६६ लाखांपर्यंत दंड माफी करत संपवला होता. 

दरम्यान पालिकेने ठोठावलेला दंड भरण्यास बीएसईने स्पष्ट नकार दिलाय. याप्रकरणी पालिका सभागृहात शिवसेना विरुद्ध भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी असे चित्र पहायला मिळाले.