Mumbai Property Registration : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून त्यांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. कारण आजपासून मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी महाग होणार आहे. आता यापुढे ऑनलाइन सेवेसाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुक्ल आकारण्यात येणार आहे. डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आत्तापर्यंत ही सेवा ग्राहकांना मोफत देण्यात येत होती. मात्र आता यापुढे मुंबईकरांना ई-नोंदणीसाठी अतिरिक्त 1,000 रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय नोंदणी विभागाने ई-फायलिंग सेवा, रजा आणि परवाना करारासाठीही अतिरिक्त 300 रुपये घेणार आहेत. (mumbai property registration cost increase now people have to pay extra charge mumbai news today)
नोंदणी विभाग ही रक्कम ग्राहकांकडून दस्तऐवजीकरण शुल्क म्हणून आकारणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. खरं तर कोरोनाच्या काळात नोंदणी कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी विभागाने ई-नोंदणी सेवा मोफत सुरु केली होती. या प्रक्रियेमुळे मुंबईकरांना प्रत्यक्ष जाऊन व्यवहार करण्याची गरज उरली नाही. कारण नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन होत आहे. अगदी सर्व नामांकित बांधकाम व्यावसासिकांनीही आपल्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचतोय.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष आनंद गुप्ता यांनी सांगितलं की, या शुल्काचा ग्राहकांवर फारसा परिणाम दिसून येणार नाही. ई-नोंदणीमुळे ग्राहकांचा वेळ तर वाचतच आहे शिवाय कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा खर्चही वाचतोय.
विभागाने शुक्ल आकारण्यामागे कारण असं की, नोंदणी विभागानुसार, ग्राहकांना ऑनलाइन सेवा देण्यासाठी सॉफ्टवेअर, स्टोरेज, सर्व्हर आणि हार्डवेअरवर खर्च होतोय. ही सेवा सुरू ठेवण्यासाठी ई-नोंदणी, ई-फायलिंग सेवा आणि रजा, परवाना करारासाठी दस्तऐवजीकरण शुल्क घेणे आवश्यक असल्याचं विभागाचं म्हणं आहे.
ई-फायलिंग सेवा: रु. 300
रजा आणि परवाना करार: रु. 300
ई-नोंदणी सेवा: रु. 1000