...तर मी अमेरिकेला निघून जाईन; 'तो' विषय काढताच बच्चू कडू चिडले

15 ऑगस्टपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अमित शाह, शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती.

Updated: Aug 6, 2023, 07:49 PM IST
...तर मी अमेरिकेला निघून जाईन; 'तो' विषय काढताच बच्चू कडू चिडले title=

Bacchu Kadu : भाजपचे बडे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर राज्य मंत्रीमडळाच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑगस्ट महिन्यातच  शिंदे-फडणवीस-अजित पवार या महायुतीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादील 9 मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप तसेच शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. अपक्ष आमदार   बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाबाबतची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. 

सरकारनं आता मंत्रिमंडळ विस्तार करू नये - बच्चू कडू यांची भूमिका

मंत्रिमंडळ विस्तारावर आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केलीय. सरकारनं आता मंत्रिमंडळ विस्तार करू नये. मंत्रीमंडळ विस्तार केलाच तर अमेरिकेला निघून जाईन, अशी खदखद आमदार कडू यांनी बोलून दाखवलीय. यापुढे सरकानं आणखी चार जणांना दुखावू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय. तर आमच्यात कुणीही नाराज नाही आणि असलंच तर त्यांची समजूत घातली जाईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटल आहे. 

15 ऑगस्टआधीच मंत्रिमंडळ विस्तार? 

15 ऑगस्टआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाहांसोबतच्या बैठक पार पडली. या बैठकीत विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचं समजतंय.. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच पालकमंत्री घोषित होतील अशीही माहिती मिळत आहे. 

तुम्ही खूप उशीर केलात - अजित पवार यांच्याबाबत अमित शाह यांचे मोठं विधान 

अजितदादा तुम्ही ब-याच काळानं योग्य ठिकाणी बसलात, खरं तर तुम्ही खूप उशीर केलात असं मोठं विधान अमित शाहांनी केलंय. पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शाहांनी जाहीरपणे हे विधान केलाय. अजितदादा तुमची जागा इथेच आहे असंही अमित शाहांनी म्हंटलंय.

जयंत पाटील अमित शाहांना भेटल्याची चर्चा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अमित शाहांना भेटले अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती मात्र या चर्चांना खुद्द पाटलांनी पूर्णविराम दिला आहे. आपल्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत, आपण भाजपसोबत जाणार नाही. अमित शाहांना कधी भेटलो याचं संशोधन करा असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. जयंत पाटलांनी अमित शाहांची भेट घेतली अशा चर्चांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला. तर, दुसरीकडे सुमन पाटील यादेखील शरद पवारांच्या गटातच आहेत. त्या राष्ट्रवादी सोडणार नाहीत असं स्पष्टीकरण त्यांचे सुपत्र रोहित पाटील यांनी दिले.