मुंबईत ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण यंदा कमी

117 डेसिबलपर्यंत तीव्रता असलेले फटाक्यांचे आवाज नोंदवले गेले असल्याचा दावा आवाज फाऊंडेशनने केला आहे. 

Updated: Oct 22, 2017, 11:36 PM IST
मुंबईत ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण यंदा कमी title=

मुंबई : गेल्या काही वर्षाप्रमाणे दिवाळीच्या काळांत फटाक्यामुळे होणारे ध्वनी प्रदुषण, याही वर्षी कमी झाल्याची माहिती आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख सुमायरा अब्दुलाली यांनी दिली आहे. 

फाऊंडेशनतर्फे दिवाळीच्या पहिल्या दिवशी रात्री उशीरा मुंबईत ठिकठिकाणी फटाक्यामुळे होणारी आवाजाची तीव्रता मोजली गेली. तेव्हा 10 पर्यंत फटाक्यामुळे होणारे ध्वनी प्रदुषण - आवाजाची तीव्रता गेल्या काही वर्षाच्या तुलनेत सरासरी कमी असल्याचं संस्थेला आढळून आलं. 

तेव्हा अनेक वर्षाच्या तुलनेत यावेळची दिवाळी कमी आवाजाची होती. असं असलं तरी 10 नंतर फटाके वाजवण्याची परवानगी नसतांनाही फटाके वाजवले जात होते. 

विशेषतः याच काळांत 117 डेसिबलपर्यंत तीव्रता असलेले फटाक्यांचे आवाज नोंदवले गेले असल्याचा दावा आवाज फाऊंडेशनने केला आहे. 

ध्वनी प्रदुषण जरी कमी झाले असले तरी फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदुषण, फटाक्यांमध्ये वापरल्या जाणा-या घातक रासायनिक पदार्थांचे काय ? याबाबत सरकारने लक्ष घालण्याची मागणी आवाज फाऊंडेशनने केली आहे.