Mumbai Local : मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर एका तरुणाचा भीषण अपघात झाला. पश्चिम रेल्ववरील भाईंदर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने अचानक भिंतीवर चढून रुळावर उडी मारली. मात्र यावेळी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत या तरुणाला रुळावरून हटवून त्याचा जीव वाचवला. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या सगळ्या प्रकाराची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाईंदर पूर्व ते पश्चिमेला जोडणाऱ्या एफओबीवरून एका व्यक्तीने उडी मारल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या फूट ओव्हर ब्रिजजवळ हा सगळा प्रकार घडला. हा तरुण अचानक त्या पुलावर चढला आणि त्याने थेट रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. पुलावरुन खाली उडी मारल्याने त्या तरुणाला जबर मार लागला. त्यामुळे तो वेदनेने विव्हळत होता. त्याचवेळी आरपीएफच्या जवानांनी आणि रेल्वे प्रवाशांनी त्या तरुणाकडे धाव घेतली. त्यांनी तरुणाला लगेचच उचलून घेतलं आणि रेल्वे ट्रॅकपासून बाजूला केलं.
आरपीएफच्या जवानांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पश्चिम रेल्वेने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. "आरपीएफ कर्मचाऱ्यांनी भाईंदर येथील एका व्यक्तीला एफओबी वरून थेट रुळांवर उडी मारल्यानंतर धावण्यापासून रोखले. त्याला मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच्या कुटुंबीयांना आणि योग्य अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. पश्चिम रेल्वे प्रत्येकाला रेल्वे ट्रॅकवर अतिक्रमण करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन करते," असे पश्चिम रेल्वे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Alert #RPF Staff at Bhayandar promptly stopped a man from being run over after he jumped from an FOB directly on the tracks.
He was admitted to a multi-specialty hospital & his family & appropriate authorities were informed.WR urges everyone to refrain from trespassing on… pic.twitter.com/CfwyQWZvVd
— Western Railway (@WesternRly) February 24, 2024
मोटरमनशिवाय धावली मालगाडी
जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने निघाली. उतारामुळे ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय धावू लागली. त्यानंतर जवळपास 100 किलोमीटरपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय धावत राहिली. खूप प्रयत्नांनंतर, मालगाडी पंजाबच्या मुकेरियनमधील उन्ची बस्सीजवळ थांबवण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही घटना रविवारी सकाळी 7.10 च्या सुमारास घडली. चालकाने कठुआ, जम्मू येथे मालगाडी थांबवली होती. ड्रायव्हर मालगाडीमधून खाली उतरून चहा प्यायला गेला. दरम्यान, मालगाडी अचानक पुढे जाऊ लागली.