Gold Price Today: कमोडिटी बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. घरगुती वायदे बाजारात सोनं सकाळी 79,400 रुपयांच्या वर पोहोचले आहे. तर, चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. 91,400 रुपयांवर स्थिरावले आहे. मात्र सराफा बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. आज काय आहेत सोन्याचे दर? जाणून घ्या.
MCX वर आज सोनं सकाळी 10.20 वाजण्याच्या सुमारास 116 रुपयांची घट झाली असून 79,448 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. काल सोन्याचे व्यवहार 79,564 रुपयांवर स्थिरावले होते. तर, चांदीच्या दरात यावेळी 477 रुपयांची घसरण झाली होती. त्याचबरोबर 91,467 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. तर काल चांदी 91,944 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता.
सोन्याच्या दरात या आठवड्यातील उच्चांकी दर गाठला आहे. सोन्याचे दर 82,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले आहेत. आत्तापर्यंतच्या सर्वात उच्चांकी दर सोन्याने गाठले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सोन्याने आत्तापर्यंतचा उच्चांकी दर गाठला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या व्यापार नीतींबद्दल असलेली अनिश्चिततामुळं मौल्यवान धातु आणि गुंतवणुकीबाबत दृष्टीकोन बदलू शकतो.
99.9 टक्क्यांच्या शुद्धतेचे सोनं यावर्षीय 31 ऑक्टोबर 2024 साली 82,400 रुपयांच्या उच्चांकी दरावर पोहोचले होते. त्याचदिवशी 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. त्यानंतर आज सोन्याचे दरांने उच्चांकीचे रेकॉर्ड गाठले आहेत. बुधवारी चांदीदेखील 1 हजारांनी वाढून 94,000 हजार प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.