राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी (baba siddiqui murder case) पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली आणि अम्बरनाथमध्ये राहाणारे आहेत. नितीन गौतम सप्रे (32) डोंबिवली, संभाजी किशन परबी (44) अंबरनाथ, राम फुलचंद कन्नौजिया (43) पनवेल, प्रदीप तोंबर (37) अंबरनाथ आणि चेतन दिलीप पारधी (33) अंबरनाथ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यातील नितीन सप्रे आणि राम कन्नौजिया असल्याचं पोलिासांनी सांगितलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या चालवणाऱ्या आरोपींना या दोघांनी तीन हत्यारं दिली होती. ही हत्यारंही पोलिसांनी जप्ते केली आहेत.
सप्टेंबर महिन्यात हल्ल्यातील दोन आरोपी एका दिवसासाठी नितीन सप्रे आणि राम कन्नौजियाबरोबर कर्जतमध्ये थांबले होते. यादरम्यान या दोघांनी आरोपींना काही पैसेही दिले होते. आता आरोपींनी बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण कुठे घेतलं याचा पोलीस तपास करत आहेत. नितीन सप्रे हल्ल्याचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या संपर्कात होता. हल्लेखोर शिवकुमार आणि धर्मराज हे कुर्लात राहाण्याआधी कर्जतमध्ये एक रुम भाड्याने घेऊन राहात होते.
पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी तुर्कीत बनवलेल्या 7.62 एमएम च्या टिसास पिस्तुलात गोळीबार केला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले बिश्नोई गँगच्या संपर्कात
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जतमध्ये पोलिसांनी छापेमारी केली. तिथून या पाच आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संपर्कात होते.
बाबा सिद्दीकी यांची हत्या
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि अभिनेता सलमान खानचे मित्र बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मुंबईतल्या वांद्रे इथल्या आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णलयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हल्ला झाल्यानंतर पळून जाणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. हल्ला करणारे आरोप कुर्ला इथं भाड्याची खोली घेऊन राहात होते, असं पोलीस तपासात समोर आलं होतं. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतलीय.