मुंबई : महापालिकेच्या सुधार समितीत मेट्रो ३ प्रकल्पाला भूखंड देण्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले.
शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीनं मेट्रो ३ ला १५ भूखंड देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. कुलाबा ते माहिम दरम्यान ४ भूखंड कायमस्वरूपी तर ११ भूखंड तात्पुरत्या स्वरूपात मेट्रो ३ ला देण्याचा प्रस्ताव सुधार समितीसमोर आला होता.
हे भूखंड दिल्यानं सामान्य नागरिकांची गैरसोय होणार असल्याचा मुद्दा शिवसेनेनं मांडला. तर शिवसेना मेट्रो ३ च्या मार्गात अडथळे आणत असल्याचा आरोप भाजपनं केलाय.
यापूर्वी देखील भूखंड देण्याचे प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळून लावलेत. परंतु राज्य सरकारनं आपल्या अखत्यारीत हे भूखंड मेट्रोला दिले.