Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...

Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक 

नेहा चौधरी | Updated: Dec 23, 2023, 10:44 AM IST
Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस... title=
mumbai mega block on 24 December 2023 Sunday central line harbor line and Western Line khopoli local canceled for next six days mumbai news in marathi

Mumbai Local Mega Block : नाताळाच्या सुट्ट्या असल्याने रविवारी मुंबईकर फिरण्यासाठी बाहेर पडणार. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रविवारी 24  डिसेंबर 2023 चं लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली भाईंदर स्थानकादरम्यान शनिवारी 23 डिसेंबर 2023 ला रात्रीचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळे पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (mumbai mega block on 24 December 2023 Sunday central line harbor line and Western Line khopoli local canceled for next six days mumbai news in marathi)

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक किती वाजता?

कुठल्या स्थानका दरम्यान - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक
किती वाजता मेगाब्लॉक - रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत
मेगाब्लॉकदरम्यान लोकलची स्थिती - सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरुन धावणार आहेत. तर ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंडमधून डाऊन जलद मार्गावरुन धावण्यात येणार आहे. ठाणेमधून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. माटुंगामध्ये अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. 

हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक किती वाजता?

कुठल्या स्थानका दरम्यान - पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर
किती वाजता मेगाब्लॉक - रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत
मेगाब्लॉकदरम्यान लोकलची स्थिती - सीएसएमटी – बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.  तर ठाणे – पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा असणार आहे. ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान आणि बेलापूर / नेरूळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान लोकल सेवा सुरु राहणार आहेत. 

हेसुद्धा वाचा - Mumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी

'या' स्टेशनबद्दल मोठी अपडेट 

मध्य रेल्वे मार्गावरील खोपोली स्टेशनबद्दल मोठी अपडेट आहे. खोपोली – कर्जत शेवटची लोकल 6 दिवसांसाठी रद्द केली आहे. आजपासून 28 डिसेंबरपर्यंत ही शेवटची लोकल धावणार नाही.  कर्जत – खोपोली दरम्यानच्या 15 किमी मार्गावरून ताशी 60 किमीऐवजी 90  किमी वेगाने लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यासाठी पायाभूत सुविधानसाठी यासाठी पळसधरी – खोपोली अप आणि डाऊन मार्गावर तीन तासांचा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक रात्री 1.25 ते पहाटे 4.25 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे खोपोलीहून रात्री 12.30 वाजता सुटणारी आणि रात्री 12.55 वाजता कर्जतमध्ये पोहोचणारी खोपोली – कर्जत लोकल ब्लॉकदरम्यान 6 दिवसांसाठी असणार आहे. या सहा दिवसांमध्ये सीएसएमटीमधून रात्री 10.28 वाजता खोपोलीला जाणारी शेवटची लोकल असणार आहे.