Mumbai Crime : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai Crime) एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला पोलंडची (Poland) असल्याची माहिती समोर आली असून मनीष गांधी (Manish Gandhi) नावाच्या आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. आरोपीविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनीष गांधी याने 2016 ते 2022 दरम्यान महिलेवर अनेकदा बलात्कार केला.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अंधेरी येथील एशियन बिझनेस एक्झिबिशन अँड कॉन्फरन्सेस (एबीईसी) या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक असलेल्या मनीष गांधींवर 34 वर्षीय पोलिश महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मनीष गांधीचा शोध सुरु केला आहे. आरोपीविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी महिलेला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता अशीही माहिती समोर आली आहे.
Mumbai: Foreign woman raped, case registered against the accused Manish Gandhi in Mumbai’s Amboli station, police searching for the accused. Case registered under sections of IPC. The victim is a resident of Poland: Mumbai Police
— ANI (@ANI) March 11, 2023
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत होता. तसेच त्याच्या आधारे तो महिलेला धमकावायचा आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पोलंडची रहिवासी आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार महिलेने दावा केला की, मनीष गांधींनी 2016 पासून जर्मनी, नवी दिल्लीतील विविध हॉटेल्स आणि देशाच्या इतर भागांमध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. मला ब्लॅकमेल करण्यासाठी तिचे नग्न फोटो काढले, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर अंधेरी पश्चिम येथील आंबोली पोलिसांनी गांधी यांच्यावर बलात्कार, लैंगिक छळ आणि भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय महिला पोलंडमधील लुबान येथील असून नोव्हेंबर 2016 पासून ती अंधेरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड येथे असलेल्या एबीईसी कंपनीमध्ये काम करत होती.