Mumbai Crime : मुंबईतून (Mumbai News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) विमानात बॉम्ब (Bomb Theret) असल्याची माहिती देणारा फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांची (Mumbai Police) भंबेरी उडाली होती. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन (hoax calls) आल्यानंतर पोलिसांना तात्काळ तपास सुरु केला होता. मात्र तपासानंतर एका 10 वर्षाच्या मुलाने हा फोन केल्याचे समोर आलं आहे. या लहानग्या मुलाने फोन करत खोटी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
10 वर्षांच्या मुलाने मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याचे खोटी माहिती देत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यात राहणाऱ्या या मुलाने पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकांवर फोन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. फोन करणार्याने मुलाने सांगितले की, 10 तासांनंतर उड्डाण होणार्या विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर ही अफवा असल्याचे पोलिसांनी घोषित केले.
यानंतर पोलिसांनी फोन नंबर ट्रॅक केला असता हा फोन सातारा जिल्ह्यातून एका 10 वर्षीय मुलाने केल्याचे आढळून आले. तपासणी केल्यानंतर, तो फसवणूक करणारा फोन असल्याची पुष्टी पोलिसांनी केली. मुलाला काही गंभीर वैद्यकीय समस्या आहेत आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
A fake bomb threat call was received at the Mumbai Police control room about a bomb on a plane at Mumbai airport. The call was made by a boy from Satara, further investigation is underway: Mumbai Police
— ANI (@ANI) August 25, 2023
दरम्यान, हे प्रकरण एका लहान मुलाशी संबंधित असल्यामुळे पोलीस त्याच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. साधारणपणे असे फोन केल्यावर पोलीस आरोपींवर गुन्हा दाखल करतात. मात्र मुलांशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये, त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे पालक आपल्या मुलांना अशा प्रकारच्या कृती करण्यापासून रोखू शकतील. यासोबतच बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा पर्यायही पोलिसांकडे आहे.
5 महिन्यांत 79 फोन कॉल्स करणाऱ्या व्यक्तीला अटक
पाच महिन्यांत संपूर्ण भारतभर पोलिसांना 79 खोटे फोन केल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ काही दिवसांपूर्वी पहाटे अटक केली होती.
आरोपी रुखसार अहमद हा मालवणी येथील रहिवासी आहे. त्याला मानसिक आजार आहे की नाही याची पोलीस पडताळणी करत आहेत.