Maharashtra Bhushan Award : "सगळे VIP छपराखाली अन् आप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात"; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन संतापले संजय राऊत

Maharashtra Bhushan Award ceremony : सरकारला समजायला हवं होतं की हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे, कधी संपला पाहिजे, कधी सुरू व्हायला पाहिजे. सरकारला फक्त त्यांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

आकाश नेटके | Updated: Apr 17, 2023, 12:03 PM IST
Maharashtra Bhushan Award : "सगळे VIP छपराखाली अन् आप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात"; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन संतापले संजय राऊत title=

Maharashtra Bhushan Award ceremony​ Heat Stroke : महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Awar) सोहळ्याला रविवारी गालबोट लागले. नवी मुंबईतल्या खारघरमध्ये (Kharghar) रविवारी दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या 12 अनुयायांचा उष्माघातानं ( Heat Stroke) बळी घेतला आहे. तर शेकडो जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावर शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सगळे व्हीआयपी छपराखाली आणि आप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात होते असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अमित शहा यांना वेळ नव्हता म्हणून... 

"महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारतर्फे देण्यात आला. या सोहळ्यासाठी आप्पासाहेब यांचे लाखो अनुयायी खारघरला जमणारच होते. त्यासाठी सरकारने जी तयारी करायला हवी होती ती फक्त व्हीआयपी साठी केली असं माझं म्हणणं आहे. लाखो सेवक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आप्पा साहेबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचा तो सन्मान सोहळा पाहण्यासाठी आले होते. पण भर दुपारी हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता. ऊन उतरल्यावर हा कार्यक्रम झाला असता तर ही सगळी दुर्घटना टळली असती. पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी हा कार्यक्रम करण्यात आला. सगळे व्हीआयपी छपराखाली होते आणि अप्पासाहेबांचे भक्त हे तळपत्या उन्हात होते," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

भक्तांची व्यवस्था पाहण्यापेक्षा राजकीय व्यवस्था पाहिली 

"आम्हाला या संपूर्ण सोहळ्या वरती अजिबात टीका करायची नाही कारण आम्ही आप्पासाहेबांना मानतो त्यांच्या कार्याला मानतो. अशा प्रकारच्या घटना या देशांमध्ये वारंवार होत आहे. त्यातून बोध घ्यायला पाहिजे. राज्य सरकारने हा कार्यक्रम तयार करताना बोध घ्यायला हवा. समोर 6-7 तास उन्हात बसलेल्यांची सोय न पाहाता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता. आप्पासाहेब वगळता, त्यांच्या कुरघोड्या सुरू होत्या. तो सगळा समुदाय फक्त आप्पासाहेबांचा होता. राजकीय नव्हता. तरीही राजकारणाने त्यांचा अंत पाहिला. तिथले लोक उष्माघाताने कोसळले. लाखो भक्तांची व्यवस्था पाहण्यापेक्षा राजकीय व्यवस्था पाहण्यात आली. त्यातून ही दुर्घटना घडली. कार्यक्रम किती काळ चालायला हवा हे सरकारला कळायला हवं होतं. पण सरकारने फक्त राजकीय सोय बघितल्यामुळे ही दुर्घटना घडली," असेही संजय राऊत म्हणाले.