शिवसेनेला इशारा देणा-या भाजपला खासदार अरविंद सावंत यांचे उत्तर

शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला इशारा दिलाय. आता यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला उत्तर दिले आहे. 

Updated: Jan 24, 2018, 11:50 AM IST
शिवसेनेला इशारा देणा-या भाजपला खासदार अरविंद सावंत यांचे उत्तर title=

मुंबई : शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला इशारा दिलाय. आता यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला उत्तर दिले आहे. 

काय दिला इशारा?

शिवसेना सोबत लढणार नसेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला संदेश दिल्याच झी मीडियाला सूत्रांनी सांगितलयं. शिवसेना बोलते सरकार मधून बाहेर का पडत नाही, असा सवालही विचारलाय. 

स्वबळाची भाषा

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकार्णीच्या बैठकीत २०१९ च्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव एकमतानं मजूर झाला. त्यानंतर एका भाजपच्य़ा वरिष्ठ नेत्यानं हे आव्हान दिलंय.