Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या माहिम मतदारसंघात यंदा तिलंगी लढत पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पक्षांकडून माहिम मतदारसंघातून उमेदवार उभे करण्यात आले. विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना 'राज'पुत्र अमित ठाकरे या युवा नेतृत्त्वानं आव्हान दिलेलं असतानाच या दोघांनाही टक्कर आहे ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभ्या असणाऱ्या महेश सावंत यांचं.
सदा सरवणकर यांच्या उमेदवारीवरून बराच गोंधळ आणि तणाव निर्माण झालेला असताना अखेर त्यांना उमेदवारी मिळाली आणि आता याच मतदारसंघातून पहिल्या कलांचा अंदाज घेता महेश सावंत आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पाहा या मतदारसंघातील लाईव्ह अपडेट्स आणि ताजे कल...
12.40 माहिममध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार
माहिम मतदारसंघात महेश सावंत यांच्याकडे 22249 आघाडी. सदा सरवणकर 8136 मतांनी पिछाडीवर. 7 व्या फेरीअखेर मतांची संख्या...
महेश सावंत 22249
सदा सरवणकर 14113
अमित ठाकरे 9965
10.57 : माहिम मतदारसंघात उलटफेर होणार का? सरवणकर आणि अमित ठाकरे यांना शह देत महेश सावंत बाजी मारणार का? आघाडी सावंतांकडे असल्यामुळं चर्चांना उधाण
10.20 : माहिम मतदारसंघातील दुसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी
महेश सावंत 1657 मतांनी आघाडीवर
महेश सावंत 5692
सदा सरवणकर 4035
अमित ठाकरे 3449
अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार
09.44 : दुसऱ्या फेरीनंतरही महेश सावंतच आघाडीवर
अमित ठाकरे 3443
महेश सावंत 5692
सदा सरवणकर 4030
#WATCH | Shiv Sena (UBT) leader & candidate from Mahim Assembly constituency, Mahesh Sawant visits Shree Siddhivinayak Ganapati temple in Mumbai
He says, "...I have come here to take blessings." pic.twitter.com/afrBqvtG1L
— ANI (@ANI) November 23, 2024
08.30 : विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी महेश सावंत यांनीसुद्धा सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी माहिम मतदारसंघात असणारं सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचं आव्हान असताना आपल्याला विजयाची खात्री असल्यामुळं मी निर्धास्त आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हार-जीत ही जीवनातील एक पायरी असते, त्यामुळं आपण आपली दैनंदिन कार्य सुरू ठेवावीत असं सावंत म्हणाले.
07.15 : माहिम मतदार संघाच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष.