वाणीमुळे संजय राऊत बनले 'व्हिलन'? महाविकास आघाडी तुटणार?

संजय राऊत... कधीकाळी महाविकास आघाडीचे हिरो ठरलेले राऊत आता चक्क व्हिलन ठरत आहेत. आपल्या वाणीतून आणि लेखणीतून त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचे हल्ले परतावून लावले. मात्र, आता राऊतांची लेखणी महाविकास आघाडीवरच वार करू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य फुटीवरून 'सामना'मधून त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

वनिता कांबळे | Updated: May 9, 2023, 11:39 AM IST
वाणीमुळे संजय राऊत बनले 'व्हिलन'? महाविकास आघाडी तुटणार?  title=

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यामुळ राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता. हे राजकीय वादळ शांत होत असतानाच आता  महाविकास आघाडीत (Mahavikas aaghadi) मोठी बिघाडी आली आहे. महाविकास आघाडी तुटणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.  संजय राऊत (Sanjay Raut) याचे 'व्हिलन' कर नाहीत ना? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे (Maharashtra Politics). राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य बंडावर टीका करणारा अग्रलेख सामनात पुन्हा प्रकाशित झाला आहे. या अग्रलेखामुळं संजय राऊत पुन्हा एकदा वादात सापडले आहे. राऊतांमुळं महाविकास आघाडीत मनभेद वाढतायत का अशीही चर्चा रंगली आहे. 

संजय राऊत... कधीकाळी महाविकास आघाडीचे हिरो ठरलेले राऊत आता चक्क व्हिलन ठरत आहेत. आपल्या वाणीतून आणि लेखणीतून त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचे हल्ले परतावून लावले. मात्र, आता राऊतांची लेखणी महाविकास आघाडीवरच वार करू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य फुटीवरून 'सामना'मधून त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

'सामना'तून राष्ट्रवादीवर वार 

शरद पवारांनंतर पक्ष पुढे नेणारं नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा.... सर्वकाही महाराष्ट्रातच. पक्ष पुढं नेईल असा वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा प्लॅन होता. लोक बॅगा भरून तयारच होते. मात्र पवारांच्या खेळीनं भाजपचा प्लॅन कच-याच्या टोपलीत गेला. लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग - बोर्डिंगमधलं बुकिंग अजून रद्द झालेलं नाही. असा घरचा आहेर मविआतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला देण्यात आला. त्यामुळं राष्ट्रवादी नेते चांगलेच संतापलेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशाराच भुजबळांनी दिला आहे.

तर, ज्यावेळी राऊतांवर राष्ट्रवादीची तळी उचलणारे म्हणून टीका झाली, त्यावेळी भुजबळ का बोलले नाहीत, असा सवाल ठाकरे गटानं केला आहे. दरम्यान, पूर्ण माहिती घेऊनच भाष्य करायला हवं, अशा शब्दांत शरद पवारांनी राऊतांचे कान टोचले आहेत.

संजय राऊतांची अग्रलेखातून यापूर्वीही काँग्रेस-राष्ट्रवादीवर बोच-या शब्दांत टीका केलीय. त्याच्या तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. यावेळी मात्र त्यांनी अग्रलेखातून थेट पवारांनाच लक्ष्य केलं. त्यामुळे राऊत मविआची वज्रमूठ बळकट करत आहेत की सैल अशी चर्चा आता रंगू लागली आहे.