Railway Jobs : परीक्षेचं टेन्शन नाही! मध्य रेल्वेची फक्त मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. 24 मे 2023 रोजी मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 या पत्त्यावर इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

वनिता कांबळे | Updated: May 8, 2023, 07:32 PM IST
Railway Jobs : परीक्षेचं टेन्शन नाही! मध्य रेल्वेची फक्त मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती  title=

Central Railway Bharti 2023: अनेकजण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आता सरकारी नोकरी मिळत नाही. यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना परीक्षांचे टेन्श असते. मात्र, आता मध्य रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी परीक्षेचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण,  मध्य रेल्वेची मुंबईत थेट मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती होणार आहे. मध्य रेल्वेतर्फे 24 मे 2023 रोजी थेट मुलाखती घेतल्या जणार आहेत. मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता, निकष तसेच पगार याबाबतची सर्व माहिती जाहीरातीद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. 

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. 24 मे 2023 रोजी मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 या पत्त्यावर इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. तत्पूर्वी नेमक्या कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, त्यासाठी पात्रता निकष व पगार श्रेणी काय आहेत याविषयी सर्व तपशील जाणून घेऊया. 

मध्य रेल्वे वैद्यकीय विभाग भरती पद

मध्य रेल्वे वैद्यकीय विभागात ही भरती होणार आहे.  “विशेषज्ञ / GDMO अशी सहा पदे भरली जाणार आहेत.  नोकरीचे ठिकाण मुंबईत असणार आहे.  खुल्या गटासाठी 1 जानेवारी 2023 पर्यंत 53 वर्षांपेक्षा कमी वय.  निवृत्त वैद्यकीय तज्ज्ञ व केंद्र/राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी- 67 वर्षांपेक्षा कमी वय असणार आहे. वरील पदांकरिता मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी  24 मे 2023 रोजी हजर राहायचे आहे. सकाळी  9.30 ते  11.30 या वेळेत  कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यू दुपारी बारा नंतर सुरू होणार आहेत.

मुलखतीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे (Important Documents)

  • जन्माचा दाखला
  • एमबीबीएस उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  • पदवी PG/DNB उत्तीर्ण प्रमाणपत्र/MCI मान्यताप्राप्त डिप्लोमा
  • MCI/MMC नोंदणी
  • एमबीबीएस परीक्षा दिल्याचे प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र
  • सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र
  • पगार श्रेणी (Salary Details For Mumbai Central Railway Jobs 2023)
  • GDMO: 75,000 हजार
  • विशेषज्ञ (प्रथम वर्ष) – 95 हजार
  • विशेषज्ञ (द्वितीय वर्ष)- 1 लाख 5 हजार
  • शैक्षणिक निकष व भरती संबंधित अधिक माहितीसाठी cr.indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या.