Maharashtra Crisis: शिवसेनेचे आणखी 2 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडताना दिसत आहे.

Updated: Jun 26, 2022, 05:09 PM IST
Maharashtra Crisis: शिवसेनेचे आणखी 2 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा title=

मुंबई : शिवसेनेला दररोज झटका लागत आहे. शिवसेनेचे आमदार हळूहळू शिंदेच्या गटात सहभागी होताना दिसत आहे. आज ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री उदय सामंत हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी गुवाहटीत पोहोचले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आहेत. तर 10 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. पण आता शिवसेनेचे आणखी 2 आमदार शिंदे यांच्या सपर्कात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता ते 2 आमदार कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे यांचा गट हळूहळू मजबूत होताना दिसत आहे. कारण 54 पैकी जवळपास शिवसेनेचे 39 आमदार हे शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एकीकडे शिवसेनेकडून आंदोलन होत असताना शिवसेनेतील अनेक नेते त्यांना पाठिंबा देताना दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबई, ठाण्यातील जवळपास 200 नगरसेवक देखील संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला आणखी काही धक्के लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत डॅमेज कंट्रोल सुरु झालंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. रश्मी ठाकरे या देखील शिवसेना वाचवण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. बंडखोर आमदारांच्या पत्नींना त्यांनी संपर्क केला आहे.