मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता

मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Updated: Jun 7, 2021, 04:36 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता title=

दीपक भातुसे, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ही भेट घेण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी हा दौरा निश्चित होणार आहे.  आज संध्याकाळी हा दौरा निश्चित झाला तर उद्या मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाऊ शकतात. 

मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी यासाठी ही भेट असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  अशोक चव्हाण हे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.