कार्ती चिदंबरमला चौकशीसाठी मुंबईत आणलं

आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरम याला पुढील चौकशीसाठी सीबीआयनं मुंबईत आणलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 5, 2018, 01:29 AM IST
 title=

मुंबई : आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरम याला पुढील चौकशीसाठी सीबीआयनं मुंबईत आणलं.. इंद्राणी मुखर्जीसोबत त्यांची चौकशी करण्यात आली.

मुंबईतल्या भायखळा जेलमध्ये इंद्राणीसमोर बसवून कार्तीची उलटतपासणी करण्यात आली. इंद्राणी आणि पिटर मुखर्जी हे आयएनएक्स मीडियाचे संस्थापक आहेत.

आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरम यानं 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.. या प्रकरणी सीबीआयनं त्याला चेन्नईत अटक केली.