Income Tax department Raid : यशवंत जाधव यांच्या घरी दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी

Income Tax department raid at Yashwant Jadhav house :  शिवसेनेचे महत्वाची नेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यासंदर्भातली बातमी. 

Updated: Feb 26, 2022, 10:43 AM IST
 Income Tax department Raid : यशवंत जाधव यांच्या घरी दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी   title=

मुंबई  : Income Tax department raid at Yashwant Jadhav house :  शिवसेनेचे महत्वाची नेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यासंदर्भातली बातमी. गेल्या 24 तासांपासून आयकर विभागाचे अधिकारी जाधवांच्या घरी तपास करत आहे. त्यांच्याहाती काय लागले आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Income Tax department raid at Shiv Sena Leader Yashwant Jadhav house continues from 24 hrs in Mumbai)

यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 24 तास उलटल्यानंतरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरूच आहे. तसेच घराची झडती घेण्यात येत आहे. यशवंत जाधव यांच्या घरी काल (25 फेब्रुवारी 2022) सकाळी साधारणत: सात वाजता आयकर विभागाने धाड टाकली आणि चौकशी सुरू केली. अद्याप ही चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. 

भाजपकडून यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरी छापा मारला. दरम्यान, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीत काही व्यवहारांबाबत ठोस पुरावे, माहिती मिळाली की नाही याबाबत अद्याप कुठलीही माहिती हाती आलेली नाही.

दरम्यान, शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेल्या या आयकर छापेमारीदरम्यान शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. यशवंत जाधव यांना आयकर विभागाचे अधिकारी घरातून नेणार असल्याची माहिती पसरली आणि मग रात्रीच शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली.  शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला.