मुंबई : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण बँकेने आर्थिक व्यवहारातील देवाण घेवाणीत महत्वाचा बदल केला आहे. नव्या नियमानुसार हा बदल महत्वाचा आहे, तो जाणून घेणे देखील महत्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला त्याचा आर्थिक फटका देखील बसू शकतो, किंवा ऐनवेळेस तुम्हाला पैशांची अडचण होवू शकते, यासाठी खालील बदल जाणून घ्या..
एसबीआयच्या नव्या नियमानुसार आता तुम्ही एटीएममधून एका वेळेस (एका दिवसात) फक्त २० हजार रूपये काढू शकता, याआधी दोन वेळेस २०, २० हजार करून ४० हजार काढता येत होते.
सध्या तुम्ही एसबीआयच्या एटीएममधून एका दिवसात, दोन वेळेस २० हजार आणि २० हजार करून ४० हजार काढू शकतात, पण १ नोव्हेंबरपासून फक्त २० हजार काढता येणार आहेत.
एसबीआयकडून याबाबतीत संबंधित शाखांना कळवण्यात आले आहे. एटीएममध्ये गैरप्रकारे पैसे काढण्याचे प्रकार कमी करण्यासाठी तसेच डिजिटल कॅशलेसचा फायदा जास्तच जास्त लोकांना व्हावा, कॅश संपण्याचे प्रकार कमी व्हावेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
तुम्हाला दिवसाला २० हजारपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर तुम्हाला एसबीआयने नवीन एटीएम दिलं आहे, जर तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जास्तच जास्त शिल्लक असेल.